Breaking News

पनवेलमध्ये बुद्धिबळ स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल चेस असोसिएशन आणि काळण समाज कवी रामदास शिंदे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बुधवारी (दि. 25) पनवेलच्या काळण समाज हॉलमध्येे सकाळी 9.30 वाजता सुरू होेईल.

बुद्धिबळ स्पर्धा फक्त एकाच खुल्या गटात खेळविण्यात येईल. खुल्या गटात प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रु., तृतीय दोन हजार रु., तसेच 15, 13, 11, 9, 7 वर्षांखालील गट, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार आहेत. खुल्या व 15 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांकासाठी फिरता चषक, तसेच पनवेल चेस असोसिएशनतर्फे एकूण 30 बक्षिसांचा नाताळ धमाका आहे.

स्पर्धकांनी आपला वयाचा दाखला सोबत आणणे जरुरी आहे. स्पर्धेत सहभागासाठी समीर परांजपे (7506364725), चंद्रशेखर नथुराम पाटील (9326504179), मंगला बिराजदार (9920156144), रमेश काळण (9326454091), ऋषिकेश काळे (9769521694), काळण समाज मंगल कार्यालय पनवेल येथे नोंद करावी, तर स्पर्धेची अधिक माहिती ुुु.ाूीरिीवहर.लेा/िीर 2019 वर मिळेल, असे स्पर्धाप्रमुख रमेश काळण यांनी कळविले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply