म्हसळा : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या म्हसळा तालुका अध्यक्षपदी प्रकाश गोपाळ रायकर यांची जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली आहे. ग्रामीण भागातील उपक्रमशील युवक म्हणून रायकर यांची ओळख आहे.
या पक्षांतर्गत निवडणुकीसाठी मनोज भागवत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या वेळी महेश पाटील, तुकाराम पाटील, मिना टिंगरे, प्रकाश कोठावळे, समीर धनसे, प्रियंका शिंदे, मंगेश मुंडे, जब्बरसिंह राजपूत, लहू तुरे, भालचंद्र करडे, अनिल टिंगरे, सुनिल शिंदे, गणेश बोर्ले, रमेश सावंत, शरद चव्हाण, मनोहर जाधव, जयवंत आवेरे, दिलीप कोबनाक, शरद कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
म्हसळा तालुक्यातील शिवाजी नगर (चाफेवाडी) येथील प्रकाश रायकर हे 2014 साली भाजपमध्ये सक्रीय झाले. कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी भाजपची कास धरली. येत्या काही काळात म्हसळा नगरपंचायत, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवेळी रायकर यांची बहुजन समाजातील ताकद कामी येऊ शकते.