Monday , February 6 2023

सांस्कृतिक वारसा जपणारे फडके विद्यालय

पनवेल ः प्रतिनिधी

सांस्कृतिक वारसा, नैतिकता जपणारी शाळा म्हणजे फडके विद्यालय, असे प्रतिपादन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आदर्श प्रशिक्षण अध्यापक केंद्राच्या मुख्याध्यापिका जाई जगताप यांनी केले. 

 पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात  गुरुवार दि. 12 डिसेंबर रोजी विद्यालयाच्या सभागृहात प्रमुख पाहुण्या आदर्श प्रशिक्षण अध्यापक केंद्राच्या मुख्याध्यापिका जाई जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व संस्थापकांच्या प्रतिमांच्या पूजनाने झाली. या वेळी म.ए.सो. शाळा समितीचे अध्यक्ष विजय भालेराव, इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिकच्या मुख्याध्यापिका मनीषा महाजन, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शीतल साळुंखे, माध्यमिक मराठीच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन, मराठी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका निशा देवरे, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका नमिता जोशी आणि सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.   

विद्यार्थ्यांनी ’माझा भारत देश, माझा अभिमान’ या विषयावर बहारदार कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सांस्कृतिक कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांनी भारतातील स्वातंत्र्य चळवळी, लढा, नेत्यांचे-क्रांतिवीरांचे कार्य, स्वातंत्र्याची पहाट,  स्वातंत्रोत्तर उत्सव या सर्वांचे चित्रण आपल्या नाट्यातून, नृत्यातून उलगडले. या वेळी मार्गदर्शन करताना जाई जगताप यांनी सांस्कृतिक वारसा, नैतिकता जपणारी शाळा म्हणजे फडके विद्यालय, असे सांगून उत्कृष्ट व नियोजनबद्ध सादरीकरण केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे व नियोजनाचे कौतुक केले. विद्यालयाच्या रिफ्लेक्शन मासिकाचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन आणि विद्यार्थ्यांचा गौरवदेखील करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply