Monday , January 30 2023
Breaking News

प्रस्तावित बांधकाम स्थळांना उपाध्यक्षांची भेट; गृहनिर्माण योजनेचा घेतला आढावा

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा

सिडकोच्या 95 हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेंतर्गत घरांचे बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबईतील खारघर, खारकोपर रेल्वेस्थानक, बामणडोंगरी रेल्वेस्थानक, तळोजा येथील बांधकाम स्थळांना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी भेट दिली व गृहनिर्माण योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

याप्रसंगी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत मुख्य अभियंता संजय चोटालिया, अधीक्षक अभियंता रमेश गिरी, राजाराम नायक, एम. पी. पुजारी, जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, सिडकोतील अन्य अधिकारी आणि एल एण्ड टी, कॅपेसाईट व सापूर्जी पालनजी या एजन्सीचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. सिडकोतर्फे परिवहनकेंद्रित विकास संकल्पनेवर आधारित ‘सिडको महागृहनिर्माण योजना- 2019’अंतर्गत नवी मुंबईतील विविध बस व ट्रक टर्मिनल्स आणि रेल्वेस्थानकांच्या फोर कोर्ट एरियात 95 हजार घरे बांधणे प्रस्तावित असून ही योजना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता प्रस्तावित आहे. या गृहनिर्माण योजनेंतर्गत तळोजा नोड्सह खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील बस टर्मिनस; कळंबोली व वाशी येथील ट्रक टर्मिनल आणि सानपाडा, जुईनगर, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, मानसरोवर व खांदेश्वर

रेल्वेस्थानकांच्या फोर कोर्ट एरियात घरे बांधण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या पॅकेज अंतर्गत 20,448, दुसर्‍या पॅकेज अंतर्गत 21,564, तिसर्‍या पॅकेज अंतर्गत 21,517 व चौथ्या पॅकेज अंतर्गत 23,432 घरे बांधण्यात येणार आहेत.

त्यासोबतच 7905 सदनिकांची गृहनिर्माण योजनादेखील आकारास येत आहे. अशा प्रकारे एकंदर 95 हजार सदनिकांची महागृहनिर्माण योजना सिडकोतर्फे साकारली जात आहे.  प्रत्येक पॅकेज अंतर्गत करण्यात येणार्‍या घरांच्या बांधकामाचे काम वेगवेगळ्या कंपन्यांना सोपवण्यात आले आहे. त्यानुसार पॅकेज-1 अंतर्गत बी. जी. शिर्के कन्स्क्ट्रक्शन्स टेक्नोलॉजी प्रा. लि., पॅकेज-2 अंतर्गत कपॅसाइट इन्फ्राप्रोजेक्ट लि, पॅकेज-3 अंतर्गत शापूरजी पालोनजी अ‍ॅण्ड कंपनी लि. व पॅकेज-4 अंतर्गत लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो या कंपन्यांकडून घरांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply