Breaking News

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी 25 डिसेंबरपर्यंत मागविले अर्ज

अलिबाग ः जिमाका

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणाचे 110 वे सत्र 1 जानेवारी 2020 पासून रायगड-अलिबाग येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र येथे होणार आहे.  त्यासाठी मच्छिमार युवकांकडून बुधवारी (दि.25) अर्ज मागविण्यात आले आहेत.

या प्रशिक्षणाचा कालावधी 01 जानेवारी ते 30 जून 2020 (6 महिने). त्यासाठी आवश्यक पात्रता याप्रमाणे : उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष. (आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडावी), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक आहे. (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडावी). क्रियाशील मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा.  (विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी),  उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे. 

प्रशिक्षण शुल्क प्रतिमाह 450 रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 2700. दारिद्र्यरेषेखालील असल्यास प्रतिमाह 100 रुपयेप्रमाणे सहा महिन्यांचे रु.600. (दारिद्र्यरेषेखालील उत्पन्नाचा गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडावा). इच्छुक युवकांनी भरलेले अर्ज दि. 25 डिसेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाचे दिवशी सादर करावेत. संपर्क ः  मत्स्यव्यसाय प्रशिक्षण अधिकारी रत्नाकर प्रभाकर राजम (ई-मेल षीेंरश्रळलरसीशवळषषारळश्र.लेा) मो.9421264438.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply