Breaking News

खारघरच्या केंद्रीय विहार सोसायटीमध्ये आग

पनवेल : रामप्रहर वृत्त

खारघर शहरात सेक्टर 12 मधील केंद्रीय विहार सोसायटी मधील सीएच 1  या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना सोमवारी दुपारी 1. 30 च्या सुमारास घडली. या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले.

शाश्वती सिन्हा (65) या महिला या घटनेवेळी या घरात अडकलेल्या होत्या. खारघर, कळंबोली येथील अग्निशमन दलाच्या तीन बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. या वेळी खिडकीची ग्रील तोडून अग्निशमनल दलाच्या कर्मचार्‍यांनी सिन्हा यांना सुखरूप बाहेर काढले. संबंधित इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित असल्याची माहिती केंद्रीय विहार सीएच 1 च्या सचिव

गीता चौधरी यांनी दिली.

या वेळी घटनास्थळी भाजप शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी धाव घेतली. या घटनेदरम्यान संपूर्ण केंद्रीय विहार सोसायटीमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मागील आठवड्यात देखील खारघर सेक्टर 12 मधील चौदा मजली निलगिरी अपार्टमेन्टला आग लागल्याची घटना घडली होती.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply