उरण : वार्ताहर
जेएनपीटीने दक्षता जनजागृती आठवडा साजरा करण्यासाठी उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी कुमारी कल्याणी ठाकूर हिने वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रुपये 2000 व प्रशस्तीपत्र, कार्टून स्पर्धेत कुमारी रितू घरत द्वितीय क्रमांकाचे रोख रुपये 2000 व प्रशस्तीपत्र, कुमारी सिमरन मोकल तृतीय क्रमांक रोख रुपये 1000 व प्रशस्तीपत्र व झैद मन्सूर यास उत्तेजनार्थ रोख रुपये 500 व प्रशस्तीपत्र अशी बक्षिसे मिळाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे ह्यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे युवा माहिती दूत योजने अंतर्गत शासकीय योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेला व्हावी ह्या साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. 31 विद्यार्थ्यांना शासकीय प्रमाणपत्र मिळाले व ह्या प्रमाणपत्रांचे वाटप व राष्ट्रीय सेवा योजने मार्फत विद्यार्थिनींची मोफत संपूर्ण रक्त तपासणी केली होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. गोरख सांगळे ह्यांनी आपण सर्वांनी सर्व स्पर्धांमध्ये व महाविद्यालयात चालू असलेल्या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे व आपल्या व्यक्तिमत्त्वला कलाटणी द्यावी असे आवाहन करून विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.