मोहोपाडा ः वार्ताहर
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील अजिवली गावातील रोशन जनार्दन खंडागळे याची पत्नी व मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. अजिवलीत राहणारे रोशन खंडागळे हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाची गुजराण करीत आहे. अचानक पहाटेच्या सुमारास राहत्या घरातून स्वप्नाली खंडागळे हि सहा महिन्याच्या छकूलीसह घरातून निघून गेली. ती घरी न परतल्याने रोशनने आपली पत्नी व मुलगी हरविल्याची पोलिसांत तक्रार केली आहे.
स्वप्नाली रोशन खंडागळे (वय 21) ही दिसायला सावली असून तिचे केस लांब आहेत. गल्यात काळया मण्याचे डोरले, उंची 4 फुट 4 इंच, अंगात लाल रंगाचा गाऊन असा वेश परिधान केला आहे तर मुलगी छकुलीच्या कानात पिवल्या धातूच्या वाल्या, अंगात लाल रंगाचा स्वेटर घातला आहे. याबाबत पोलिसांत मिसिंग तक्रार दाखल झाली असून या मायलेकी कुठेही आढळल्यास पोलीस हवालदार सचिन गोसावी मो-8169715228 यावर अथवा पनवेल तालुका पोलीस ठाणे फोन-022/27452444 या क्रमांकावर संपर्क साधावा.