उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गावातील कातळपाडा येथे दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने मराठी रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा मराठी लोकगीतांचा कार्यक्रम नुकताच कातळपाडयातील श्रीदत्त मंडळाच्या रंगमंत्रावर झाला. विजय कर्जावकर, राजरत्न भोसले, गायिका नम्रता वेस्वीकर, सुजाता गोंधळी व गणेश गव्हाणकर यांनी मराठी लोकधारा या कार्यक्रमातून रसिक मनाला मंत्रमुग्ध केले. विशाल सदाफुले आणि लव अवघडे या कलाकारांनी दत्तगुरू महाराज, संभाजी महाराज खंडेराय, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी समर्थ या विभुतींच्या वेशभुषेतुन प्रासादिक वातावरण रसिकांसाठी निर्माण केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक संतोष लिंबोरे यांनी केले. संगीत संयोजन जयेश चाळके, वादक संदीप डावरे, अभिजित मोरे, निखील महाराव, संकेत चाळके, अजय सरोदे, साऊंड व लाईट सचिन गव्हाणकर, व्यवस्था दिपक, पपन व कल्पेश यांची होती.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …