मुंबई ः उद्धव ठाकरेंचे सरकार हे गुंडांचे सरकार असल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. नागपुरातील महापौरांवर झालेला गोळीबार आणि शिवसेनेकडून मिळत असलेल्या धमक्या यावरून हे सरकार गुंडांचे असल्याचे सिद्ध होत आहे, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली. शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने धमक्या येत असल्याची तक्रारही किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि गृहखात्याकडे केली आहे. शिवसेनेकडून जीवाला धोका असल्याचे पत्र किरीट सोमय्या यांनी राज्यपाल आणि गृहखात्याला लिहिले आहे. मागील दोन वर्षांपूर्वीं तुझ्यावर जो हल्ला झाला तो लक्षात ठेव, अशी धमकी देणारा फोन आपल्याला आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …