
पनवेल : रामप्रहर वृत्त
सीकेटी महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे शुक्रवारी (दि. 8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयुर्वेद तज्ज्ञ व येरला मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. निरंजन पटेल यांनी महिलांच्या आरोग्यासाठी
आयुर्वेद आणि योगाचे महत्त्व विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर महिला यांना शुभेच्छा दिल्या.
प्रा. डॉ. रत्नप्रभा म्हात्रे आयुर्वेद आणि योगा यांचा महिलांच्या आरोग्याशी संबंध या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे यांनी सर्व महिलांचे मनापासून कौतुक केले. आभार डॉ. स्मिता भोईर यांनी मानले.