उरण : वार्ताहर
उरण भाजपच्या वतीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 20) ते रविवारी (दि. 22) सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत भाजप कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आले आहे. भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, नगरसेवक राजेश ठाकूर, कॉमन सर्व्हिस सेंटर-कोप्रोली (उरण)च्या संचालिका स्मिता म्हात्रे, ऑपरेटर राजेश म्हात्रे, समीर पाटील, प्रियांका म्हात्रे तसेच नगरसेवक, नगरसेविका, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष पंडीत घरत, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, रोहित नितीन पाटील, कार्यकर्ते मनोहर सहतीया, पाले गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा कार्यकर्ते संदीप म्हात्रे आदी उपस्थित होते. भारत सरकारच्या प्रधान मंत्री-जनआरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेच्या गोल्डन कार्डसाठी उरण शहराच्या लाभार्थींची माहिती गोळा करून त्यांना आयुष्यमान योजनेचे गोल्डन कार्ड देण्यात येईल. ज्यामध्ये त्या कुटुंबातील लोकांना सरकारी व खाजगी दवाखान्यात पाच लाखापर्यंत मेडिकलचा लाभ मिळणार आहे. ज्याची नावे आयुष्यमान भारत योजनेत नाहीत त्यांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये सामावून घेण्यात येईल.