Breaking News

खालापुरात दुय्यम निबंधक लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
दस्तऐवज नोंदणीकामी लाचेचा पहिला हप्ता एक लाख रुपये घेताना खालापूर दुय्यम निबंधक सुरेंद्र शिवराम गुप्ते (वय 53, सध्या रा. कर्जत, मूळ  नाशिक) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे खालापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
बांधकाम व्यावसायिक किशोर बाफना यांनी खालापूर तालुक्यातील खरिवली व नंदनपाडा भागात जमीन खरेदी केली आहे. या जमिनीचे दस्त नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक गुप्ते यांनी पाच लाख रुपयांची मागणी बाफना यांच्याकडे केली होती. तडजोडीअंती साडेतीन लाख रुपये देण्याचे ठरलेे. दरम्यान, बाफना यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. ठरलेल्या लाचेच्या रकमेपैकी एक लाख रुपये स्वीकारताना गुप्ते यांना सोमवारी रात्री चौक फाटा येथील स्वराज्य हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी गुप्ते यांच्यावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply