Monday , February 6 2023

दिवंगत कर्मचार्यांच्या वारसांना आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेंतर्गत मंजूर करण्यात आली होती. पनवेल महापालिकेचे सफाई कामगार अरुणा चंद्रकांत कदम यांचे वारसदार चंद्रकांत पाढूरंग कदम व सफाई कामगार कांतीलाल कलोते यांच्या वारसदार सविता कांतीलाल कलोते यांना प्रत्येकी रुपये दहा लाखांचा प्रतिकात्मक धनादेश महापौर डॉ. कविता चौतमोल व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ही रक्कम संबंधित वारसांच्या बँक खात्यात विमा संचालनालयातर्फे यापुर्वीच आरटीजीएसने थेट जमा केली आहे. ही रक्कम राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेंतर्गत मंजूर करण्यात करीता महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, उप आयुक्त (मुख्यालय) जमिर लेंगरेकर, उप आयुक्त संजय शिंदे व सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर यांना दिवंगत कर्मचार्‍यांच्या वारसांना ही रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार सर्व कागद पत्रांची पुर्तता करुन व राज्य विमा संचालक यांच्या सहकार्यातून ही रक्कम अल्पावधीत संबंधित वारसांना देण्यात आली, त्याबद्दल राज्य शासनाने महानगरपालिकेचे पत्राद्वारे आभार व्यक्त केले आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त व त्यांचे सहकारी यांनी सतत पाठपुरावा करुन मानवतेच्या दृष्टीकोनातून संबंधीत दिवंगत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत मिळवून दिल्याबद्दल महापौर, उप महापौर, सभागृह नेते व पदाधिकार्‍यांनी आयुक्त व त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन केले. या वेळी उप महापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बाल कल्याण सभापती कुसुम रविंद्र म्हात्रे, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, उप आयुक्त संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर आदी  उपस्थित होते. या योजनेअंतर्गत शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांना अपघाती मृत्यू अथवा कायमस्वरुपी अपंगत्व अथवा विकलांग आल्यास हा सदस्य कर्मचार्‍यास अथवा त्याच्या नामनिर्देशित वारसांना आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई देण्यासाठी अत्यंत माफक म्हणजे रु. 354 प्रतिवर्षी इतक्या वर्गणीमध्ये अपघात विमा संरक्षण पुरविण्याचा कल्याणकारी निर्णय शासनाने घेतला.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply