मुंबई ः कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या विळख्यातून देश हळूहळू बाहेर पडत असला तरी संभाव्य तिसर्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. या पार्श्वभूमीवर झायडस कॅडिला कंपनीच्या कोविड-19वरील लस झायकोव्ह-डीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. देशात कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक, मॉर्डनानंतर उपलब्ध होणारी ही पाचवी लस आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा आणखी मजबूत होणार आहे. झायडस कॅडिलाची लस कोरोनाविरुद्धही प्लाज्मिड डीएनए लस आहे, असा दावा कंपनीने केला आहे. या लसीला मंजुरी मिळाल्यामुळे केवळ प्रौढच नव्हे तर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांनादेखील लाभ होणार आहे, परंतु या लसीचे तीन डोस असणार आहेत.
Check Also
माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास
ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …