Breaking News

स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठ्याकरिता प्रयत्न करणार -सभापती बाफना

मुलांच्या शिक्षणाकरिता इंग्लिश मीडियम शाळेची निर्मिती

पेण : प्रतिनिधी

नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना स्वच्छ व नियमितपणे मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी तत्परतेने काम करणार असल्याचे शिक्षण, क्रीडा व पाणीपुरवठा सभापती दर्शन बाफना यांनी सांगितले. पेण नगरपालिकेचे नवनिर्वाचित शिक्षण, क्रीडा व पाणीपुरवठा सभापती दर्शन बाफना यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरपालिकेच्या माध्यमातून इंग्लिश मीडियम शाळेची निर्मिती करण्याचा मनोदय या वेळी त्यांनी व्यक्त केला. आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या सहकार्याने येणार्‍या काळात जनतेची सेवा आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …

Leave a Reply