Breaking News

पनवेल फेस्टिव्हलची धूम!

पनवेल : रामप्रहर वृत्त

सलग 24 व्या वर्षी सामाजिक सेवेत कार्यरत असणार्‍या रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन 20 ते 29 डिसेंबरपर्यंत सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत खांदा वसाहत येथील मैदानात केले आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स, खवय्यांसाठी व्हेज-नॉनव्हेज स्टॉल्स, मुलांसाठी खेळण्यासाठी साधने आणि दररोज स्थानिक कलाकारांचे तसेच नामवंत कलाकारांचे मनोरंजनाचे भरपूर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. फेस्टिव्हलचे उद्घाटन नुकतेच मराठी सिनेअभिनेत्री श्रुती मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रोजेक्ट चेअरमन किरण परमार, रो. संतोष आंबवणे आदी मान्यवरांसहीत रोटरीयन व पनवेलकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नादस्फुर्ती ढोल पथकाच्या जल्लोषात पाहुण्यांनी पनवेल फेस्टिव्हलची पाहणी केली. महापौर डॉ. कविता चौतमोल या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. रोटरी क्लब ऑफ पनवेल सामाजिक योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच नागरिकांनी प्लॅस्टिक बंदीचे कठोरपणे पालन करावे व स्वच्छता मोहिमेत सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा केले. तर उद्घाटक श्रुती मराठे यांनी या फेस्टिव्हलचे कौतुक करून सामाजिक-सांस्कृतिक वारसा जतन करण्याबरोबरच पनवेलकरांच्या समस्या सोडविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल कौतुक केले. सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही सतत 24व्या वर्षी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यावरून कौतुक करून अशाचप्रकारे प्रगतीचा आलेख उंचावत ठेवा. या फेस्टिव्हलमुळे स्थानिकांना रोजगार तर कलाकारांना उपयुक्त व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रोजेक्ट चेअरमन किरण परमार यांनी पनवेल फेस्टिव्हलच्या माध्यमातून मिळणारा आर्थिक फायदा पनवेलकरांसाठीच वापरणार असल्याचे सांगत गेल्या दोन वर्षात जवळपास 50 लाख रूपये खर्चाचे प्रकल्प उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सूत्रसंचालन अध्यक्ष सुनिल लघाटे यांनी केले. तर आभार विजय मंडलिक यांनी मांडले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply