Breaking News

‘शेतकर्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी’

पेण ः प्रतिनिधी

वढाव पंचक्रोशीतील भातशेतीवर कडप्या रोग पडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी शासनाकडून पंचनामे करून शेतकर्‍यांना लवकरात लवकर आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सरपंच पूजा पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी अनिल रोकडे यांच्याकडे केली आहे.

खारेपाट भागात वढाव, मोठे वढाव, लाखोले, विठ्ठलवाडी, मोठे भाल आदी गावांतील नागरिक मोठ्या प्रमाणात भातशेती व मत्स्यशेती करतात, परंतु यंदा निसर्ग चक्रीवादळ आणि कोरोनासारख्या आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोलमडले. सावरत खारेपाट भागातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले, परंतु परतीचा पाऊस व कडप्या रोगामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

त्यामुळे वढाव ग्रामपंचायत सरपंच पूजा पाटील यांनी कृषी अधिकारी अनिल रोकडे यांच्याकडे येथील भातशेतीची पाहणी करून लवकरात लवकर शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी अनिल रोकडे, मंडळ कृषी अधिकारी सी. आर. म्हात्रे यांनी वढाव भागातील शेतीची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत सरपंच पूजा पाटील, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply