Breaking News

वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सवाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त      

गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कला व क्रीडा महोत्सव 2019-2020चे आयोजन करण्यात आले आहे. कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचलित अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 24) सायंकाळी 4 वाजता आयोजित केला आहे. या महोत्सवामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष तथा सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, रयत शिक्षण संस्थचे जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, गव्हाण गु्रप ग्रामपंचायतच्या सरपंंच हेमलता भगत, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पर्यवेक्षक डी. डी. भर्णूके, उपमुख्याध्यापक आर. एल. चौल, मुख्याध्यापक एस. ए. डोईकोडे, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख बी. पी. पाटोळे, अटल लॅबचे इनचार्ज आर.एस.भोईर, गुरुकुल प्रमुख एस. के. भोईर, रयत बँकेचे लाईफ मेंबर व संचालक पी. ए. कोळी यांनी केले आहे. महोत्सवासाठी गव्हाण पंचक्रोशीतील सर्व शिक्षणप्रेमी, सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, माजी विद्यार्थी संघ, आजी-माजी विद्यार्थी, सर्व सेवक वर्ग, पालक, सर्व व्यवस्थापन कमिटी व पालक शिक्षण संघ सदस्य मोठ्या संख्येेने उपस्थित राहणार आहेत.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply