Breaking News

सिडको उपाध्यक्षांनी दिली वाशी विभागीय कार्यालयास भेट

ऑनलाइन सेवांचा घेतला आढावा

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी (दि. 20) सिडकोच्या वाशी येथील विभागीय कार्यालयास (नोड्ल ऑफिस) भेट देत तेथील अधिकार्‍यांशी चर्चा करून ऑनलाइन सेवांचा आढावा घेतला. वसाहत विभागाच्या सेवा पूर्णत: ऑनलाइन केल्याच्या पार्श्वभूमीवर या सेवांचे कार्यान्वयन प्रभावीपणे होत आहे का, हे पाहण्याकरिता उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी ही भेट दिली. या प्रसंगी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांसमवेत अतिरिक्त मुख्य नियोजनकार रविंद्र मानकर, अधिक्षक अभियंता चंदेल मकसूद, जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, कार्यकारी अभियंता  एम. के. महाले आणि नोड्ल अधिकारी चौरे उपस्थित होते. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या निर्देशांनुसार सिडको महामंडळाच्या वसाहत विभागातर्फे देण्यात येणार्‍या विविध सेवा जसे, तारण, ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करणे, कायदेशीर वारस हस्तांतरण, विविध प्रकारच्या परवानग्या प्राप्त करणे इ. सेवा व या सेवांशी संबंधित शुल्क भरणा, कागदपत्रे सादर करणे, अर्जदारांना परवानग्या अथवा ना-हरकत प्रमाणपत्रे पाठवणे या 1 नोव्हेंबरपासून पूर्णत: ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. अर्जदार नागरिकांना वारंवार सिडको कार्यालयामध्ये येण्याची गरज भासू नये व त्यांचा बहुमोल वेळ वाचावा याकरिता या सेवा ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply