Breaking News

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिका आक्रमक

बेकायदा व्यवसायांवर धडक कारवाई

पनवेल ः वार्ताहर

तळोजा वसाहतीमधील पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय करणार्‍या अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करून पनवेल महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केलेले पदपथ मोकळे केले आहेत. तळोजामधील पाचनंद हाईट्स, कर्नाळा बँक आणि तळोजा पोलीस चौकीसमोरील चौकात बेकायदा फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय थाटल्याने नागरिकांना पदपथ आणि रस्त्यावरून चालताही येत नव्हते.

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पनवेल महापालिका अधिकार्‍यांना तळोजातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करता आली नाही. त्यामुळे रस्ते आणि पदपथांवर व्यवसाय करणार्‍या अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती.

अखेर महापालिका अधिकार्‍यांनी तळोजातील पाचनंद हाईट्स, कर्नाळा बँक आणि तळोजा पोलीस चौकीसमोरील चौकात बेकायदा व्यवसाय करणार्‍या फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली. या वेळी फेरीवाले व्यवसायासाठी वापरत असलेल्या हातगाड्या तसेच बांबू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे अनेक बेकायदा फेरीवाल्यांनी हातगाडी घेऊन पळ काढला.

तळोजात बेकायदा फेरीवाल्यांनी व्यापलेले पदपथ मोकळे करून सात हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पदपथ अडवून पक्के बांधकाम केलेल्या दुकान व्यावसायिकांना नोटीस देऊन बांधकाम हटविण्यास सांगितले आहे. दुकान व्यावसायिकांनी पदपथांवर केलेले बांधकाम स्वतःहून न हटविल्यास ते हटविण्याची कारवाई पनवेल महापालिकेद्वारे करण्यात येणार आहे.

-दशरथ भंडारी, ‘अ’ प्रभाग अधिकारी, पनवेल महापालिका

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply