Breaking News

स्पाईस एशिया हे रेस्टॉरंट सुरु

उलवे (ता. पनवेल) : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये स्पाईस एशिया हे रेस्टॉरंट सुरु झाले आहे. या रेस्टॉरंटचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नगरसेवक संतोष शेट्टी, युवा नेते साईचरण म्हात्रे आदी उपस्थित होते.

नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची पनवेल बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा बहुमताने निवड

पनवेल : नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची पनवेल बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बहुमताने निवड करण्यात आली. त्यानिमित्त भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भुजबळ यांचे रविवारी अभिनंदन केले. या वेळी युवा नेते मयुरेश नेटकर, प्रशांत भुजबळ, प्रकाश महानवर, रामनाथ पाटील उपस्थित होते.

बेलवली येथे क्रिकेट सामन्यांचे आयोजन

पनवेल : वारदोली येथील बालगणेश क्रिकेट संघाने बेलवली येथे क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे. या क्रिकेट सामन्यांना भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रविवारी भेट दिली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भुपेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply