Breaking News

सानपाडा कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

ओरिएंटल एज्युकेशन सोसायटी संचलित, सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीचा 10 वा वार्षिक स्नेहसंमेलन ओरिएंन्स सोहळा बुधवारी(दि.18)सिडको कनव्हेशिएल ऑडिटोरियम वाशी येथे अत्यंत उत्साहात झाला. स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता विद्युत जामवाल, अभिनेत्री व पार्श्वगायिका मानसी स्कॉट व ओरिएंटल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री प्रोफेसर जावेद खान आणि सरचिटणीस वसीम जावेद खान उपस्थित होते. सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य प्रोफेसर रावसाहेब यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व त्यांनी महाविद्यालयाच्या वाढत्या यशाचा अहवाल सादर केला. या वेळी पार्श्वगायिका प्रियांका भट्टाचार्य व नर्तककार आशुतोष प्रधान हे परीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करणार्‍यांची निवड केली. स्नेहसंमेलनाच्या दिवशी विशेष बाब म्हणजे कॉलेज वार्षिक मासिक फिनिक्स दुसर्‍या आवृत्तीचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शैक्षणिक प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रके व पारितोषिके स्नेहसंमेलनाच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply