नवी दिल्ली : केंद्रीय सुरक्षा समितीने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीडीएस पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच सीडीएसवर लष्करी विषयांवर सरकारला सल्ला देण्याची जबाबदारी असणार आहे. लष्कराच्या विविध मोहिमांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच शस्त्रास्त्र खरेदीमध्ये सीडीएसची महत्त्वाची भूमिका असेल. सीडीएसचा कार्यकाळ किती असेल ते अद्याप निश्चित झाले नाही, परंतु लष्कर, नौदल किंवा हवाई दलातून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ निवडला जाईल. सीडीएस पदावरील व्यक्ती फोर स्टार जनरल असेल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि. 24) ही माहिती दिली.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …