Breaking News

युवा निर्धार विजयी मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा शंखनाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी युवा ताकद एकवटली असून त्या अनुषंगाने युवा निर्धार विजयी मेळावा शनिवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात पनवेलमध्ये झाला. या वेळी सर्वांच्या आशीर्वादाने विजयाचा शंखनाद करण्यात आला.
पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने युवक आणि युवती उपस्थित होते. भाजप युवा मोर्चाच्या वतीने उत्कृष्ट नियोजनात हा मेळावा भूतो न भविष्यती असा होता.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, गोव्याचे आमदार दयानंद सोपटे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, सरचिटणीस निखिल चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश उपाध्यक्ष सुनील राणा, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, विधानसभा प्रमुख व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी महापौर कविता चौतमोल, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक माजी नगरसेवक हरेश केणी, अजय बहिरा, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी युवा मेळाव्याला संबोधित करताना, पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी मोठी युवाशक्ती उभी आहे. या युवाशक्तीने उत्साह कायम ठेवत मतदानाच्या तारखेपर्यंत काम करत राहिले पाहिजे आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात जे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी उभे केले आहे, ते आपण मतदारांपर्यंत पोहचवले पाहिजे, असा मार्गदर्शक सल्ला देत या आयोजनाच्या मेळाव्याबद्दल युवा मोर्चाचे कौतुक केले.
समाजात विविध क्षेत्रात वावरणारी आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने सहभाग घेणारी युवाशक्ती आहे आणि ही युवाशक्ती एकवटून एखादी निवडणूक जेव्हा हातात घेते तेव्हा त्या निवडणुकीत विजय निश्चित असतो. पनवेल विधानसभा क्षेत्रात ही निवडणूक युवकांनी हातात घेतली आहे आणि त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर हे चौथ्यांदा निवडून येतीलच यात शंकाच नाही, परंतु आपण त्यांना किती मताधिक्याने निवडून आणतोय याची आता उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे, असे विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील या वेळी म्हणाले तसेच मोठ्या मताधिक्याने जिंकायचे असेल तर युवकांनी आपल्या केंद्र आणि राज्य सरकारने ज्या काही योजना जनसामान्यांसाठी अमलात आणल्यात त्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या विधानसभा क्षेत्रात केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहचवा. या विकासकामांवर आपण पनवेल विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असेही आमदार विक्रांत पाटील पुढे म्हणाले.
पनवेल विधानसभा मतदारसंघात गेली 15 वर्षे आपले आमदार प्रशांत ठाकूर विजयी होत आहेत. त्यांनी या मतदारसंघात नागरिकांसाठी विविध विकासकामांच्या माध्यमातून मतदारांची सेवा केली आहे आणि त्यातून मतदारसंघात विकासाचा झंझावात पहायला मिळतोय, असे गोव्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी म्हटले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस अभिषेक भोपी, दिनेश खानावकर, पनवेल तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, कामोठे मंडल अध्यक्ष तेजस जाधव, कळंबोली मंडल अध्यक्ष गौरव नाईक, खारघर मंडल अध्यक्ष नितेश पाटील यांच्यासह युवा पदाधिकार्‍यांनी मेहनत घेतली.

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने पनवेल विधानसभा मतदारसंघाची मला उमेदवारी घोषित केली त्याबद्दल सर्वप्रथम पक्षनेतृत्वाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. पक्षाच्या नेतृत्वाने उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मला खात्री आहे की, सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्‍यांच्या सोबतीने या मतदारसंघामध्ये आश्वासक निर्णायक असा विजय मिळवू. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला विकास, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची होणारी प्रगती अखंडपणे चालू रहावी यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून विजयी होण्यासाठी सुज्ञ मतदार जनता, सर्व कार्यकर्ते सहकारी साथ देणार आहेत. पनवेलच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रश्न हाताळण्यासाठी आणि विकास करण्यासाठी मला जनतेने ताकद दिली. पनवेल, उरणमध्ये अनेक महत्त्वाकांक्षी आणि येथील माणसाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकल्प साकारले आणि आणखी साकारणार आहेत. हे सर्व केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुतीच्या सरकारमुळे शक्य झाले. पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वांना अभिमान वाटेल असा विजय संपादित करून या पुढील काळातही विकासाचा ओघ आणखी वाढवला जाईल.
-आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल विधानसभा मतदारसंघ

Check Also

पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ …

Leave a Reply