Breaking News

शैक्षणिक साहित्यनिर्मिती स्पर्धेत टिळक खाडे प्रथम

नागोठणे : प्रतिनिधी 

सुतारवाडी येथे 23 व 24 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या रोहे तालुका विज्ञान प्रदर्शनातील शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत माध्यमिक गटात नागोठणे विभागातील वांगणी येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक टिळक उमाजी खाडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. खाडे यांनी या स्पर्धेत प्रकाशीय उपकरणे या घटकावर अध्ययन अध्यापनास उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य तयार केले होते. या शैक्षणिक साहित्यातून प्रकाशाच्या परावर्तनासंदर्भातील विविध संकल्पना सहज स्पष्ट होतात. सर्व शाळांतील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य उपयुक्त आहे. जिल्हा परिषद सदस्य दयाराम पवार यांच्या हस्ते टिळक खाडे यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. खाडे यांच्या यशाबद्दल रोहे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे, स्थानिक शाळा समिती अध्यक्ष मधुकर ठमके, मुख्याध्यापक एल. एल. ठाकरे  यांच्यासह सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply