Breaking News

मोहोपाड्यातील शिक्षकाच्या गाण्याची गिनीज बुकात नोंद

मोहोपाडा : प्रतिनिधी

विराग मधूमालती इंटरटेन्टमेंट यांच्या वर्ल्ड सिंग मॅरेथॉन आयोजित कार्यक्रमात खारघर नवी मुंबई येथील लिटील वर्ल्ड मॉलमध्ये नॉनस्टॉप 895 तासाचा गायनाचा कार्यक्रम 38 दिवस सुरू होता. या कार्यक्रमात मोहोपाडा रायगड जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक महेंद्र जाधव यांनी गायलेल्या दहा गाण्याची गिनीज बुकात नोंद झाली आहे.

महेंद्र जाधव हे उत्तम कवी, लेखक व सुत्रसंचालक आहेत. त्यांनी याअगोदर स्वत: पंचवीस गाणे लिहीली आहेत. गायन करणे हे त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेला असल्याने महेंद्र जाधव शाळेचे कामकाज सांभाळत विविध गाणे लिहून स्वता:च्या सुमधुर आवाजात गाणे गात आहेत. महेंद्र जाधव यांचा ’एक सूर एक ताल’ हे गाणे तर ’गड आला पण सिंह गेला’हा पोवाडा प्रसिद्ध आहे. त्यांनी आजपर्यंत भक्तिगीत, शैक्षणिक, प्लास्टीक बंदी, स्त्री पुरुष समानता, भावगीत, पोवाडा आदीवर शेकडो गाणं काढून गायली आहेत. वाढदिवस कार्यक्रम आदींवर गाणे लिहून गायली आहेत. महेंद्र जाधव यांनी मोहोपाडा राजिप शाळेत दोन वर्षे  प्रभारी मुख्याध्यापकाचे काम सांभाळले आहे. विराग मधूमालती या कार्यक्रमात देशातील सर्व राज्यांतून आठशेहून अधिक गायकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात रसायनी मोहोपाडा येथील राजिप शाळेतील शिक्षक महेंद्र जाधव यांनी आपले शैक्षणिक काम सांभाळून आपल्या गायनाचा ठसा  उमटवून वर्ल्ड सिंग मॅरेथॉन या नॉनस्टॉप गायनात गिनीज बुकात महेंद्र जाधव यांच्या दहा गाण्याची नोंद झाली आहे. याअगोदर चीनचा 792 तास गायनाचा विश्वविक्रम मोडत काढीत 895 तास 4 मिनिटांचा सलग गायनाचा विश्वविक्रम केला. त्यांना चिराग मधुमालती इंटरटेंनमेटच्या वतीने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मोहोपाडा राजिप शाळेचे शिक्षक महेंद्र जाधव यांच्या गाण्यांची गिनीज बुकात नोंद झाल्याने त्यांच्या वर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply