पनवेल ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील नवीन पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस नाईक केसरीनाथ म्हात्रे यांच्या इमानदारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नवीन पनवेल वाहतुक शाखा येथे नेमणूक असलेले पोलीस नाईक केसरीनाथ दामाजी म्हात्रे हे कर्तव्य बजावत असताना त्यांना एक पॉकेट मिळाले या पाकिटात महत्वाची कागदपत्रे व रोख रक्कम 8500 होती त्यांनी हे पॉकेट भरत धर्मा पाटील रा. पागोटे ता. उरण यांचे असल्याचे माहिती होताच त्याची खात्री करून त्यांना ते परत केले. केसरीनाथ म्हात्रे यांच्या या कार्याचा राजे प्रतिष्ठानचच्या वतीने जाहीर सत्कार केला.