पनवेल ः सार्वजनिक ठिकाणी रस्त्याने ये-जा करणार्या पुरुषांना अश्लिल हावभाव, खाणा खुणा, इशारे करून त्रास होईल असे अश्लिल कृत्य करणार्या दोघा महिलांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी पटवर्धन हॉस्पिटल समोरील रस्त्यावर निसार आझाद शेख (29) व परवीना खलिफा (54) या दोघी रस्त्यावरुन ये-जा करणार्या पुरुषांना अश्लिल हावभाव, खाणा खुणा, इशारे करून त्रास होईल असे अश्लिल कृत्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना होवून त्यांनी या दोघींना भादवी कलम 294 अंतर्गत ताब्यात घेतले आहे व त्यांच्या विरुद्ध कारवाई केली आहे.