पेण : प्रतिनिधी
येथील नगर परिषदेच्या कै. मामा वासकर जलतरण तलावात सराव करणारे पेण तालुक्यातील सहा जलतरणपटू धरमतर ते एलिफंटा आयलँड असे सहा वेळा म्हणजेच 233 किलोमीटर अंतर रिले पद्धतीने सलग चार दिवस व तीन रात्री पोहून जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.
भावेश निलेश कडू, मधुरा गिरीश पाटील, नील योगेश वैद्य (12), सोहम राजेंद्र पाटील, श्रवण राजू ठाकूर व अथर्व मुकेश लोधी (सर्व वय 12) हे सहा जण 5 ते 8 जानेवारी 2020 कालावधीत विक्रम करण्यासाठी तयारी करीत आहेत. त्यांचा हा रेकॉर्ड ‘बेस्ट ऑफ इंडिया’साठी दखलपात्र होणार आहे. या जलतरणपटूंना हिमांशू मनोज मलबारी यांचे मार्गदर्शन लाभत असून, ते तीन महिने सतत परिश्रम करीत आहेत. ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनचे संतोष पाटील हे या इव्हेंटचे मार्गदर्शक आहेत, तर महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे खजिनदार पांडुरंग म्हात्रे व पेण तालुका हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष मंगेश नेने सहकार्य करीत आहेत.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper