पनवेल : रामप्रहर वृत्त
बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान, युवा गु्रपच्या वतीने ‘युवा महोत्सव 2019’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि.29) झाला. सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून, त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला.
पनवेल शहरातील महोत्सव शहरातील वरदविनायक सोसायटी समोरील मैदानात 25 ते 29 डिसेंबर दरम्यान ‘युवा महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून, या महोत्सवास उदंड प्रतिसाद लाभला. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी नृत्यस्पर्धा, आयोजित करण्यात आली होती. तसेच या वेळी विशेष पुरस्कार आणि विशेष नैपुण्य गौरव पुरस्काराने अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यास बाळासाहेब पाटील, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेविका नीता माळी, भाजप नेते तानाजी खंडागळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपल्या मनोगतामध्ये सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तींना अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.