Breaking News

रेझिंग डेनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

खालापूर : प्रतिनिधी

पोलीस दल स्थापना दिन अर्थात रेझिंग डेच्या निमित्ताने खोपोली पोलीस ठाणे व सहज सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि. 2) येथील छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कायदे समजून घेऊन त्याचे वैयक्तिक जीवनात पालन करावे, असे सांगून त्यांनी  पोलीस यंत्रणेच्या सेवाभावी मुळ तत्वांविषयी माहिती दिली.

पोलीस हे आपले मित्र आहेत, विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती निघून गेली, तर समाजाला एक वेगळी चालना मिळू शकते, असे मत यावेळी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी व्यक्त केले. या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. शस्त्रांची तांत्रिक व पोलिसांची कार्यपद्धती याविषयीची माहिती या वेळी देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन सताने यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, खजिनदार संतोष गायकर, उपक्रम प्रमुख वर्षा मोरे, सलमान शेख, बी. निरंजन, नगरपालिका शिक्षण मंडळाचे पठाण सर व निशिकांत सुर्वे तसेच कृष्णकांत गडदे, अजिंक्य पाटील यांनी विशेष सहकार्य केले. या वेळी मुख्याध्यापक मोहन पाटील, वाय. जी. गोंडा, आडकर मॅडम, माने मॅडम यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply