Breaking News

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कर्जतमध्ये अभिवादन

कर्जत : प्रतिनिधी

स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, महिलांना स्वावलंबनाचा महामंत्र देणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना 189 व्या जयंतीनिमित्त कर्जत नगर परिषदेच्या वतीने शुक्रवारी (दि. 3) अभिवादन करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी  नगरसेविका स्वामिनी मांजरे, मधुरा चंदन, सुवर्णा निलधे, संचिता पाटील,  वैशाली मोरे, प्राची डेरवणकर आदींसह अरविंद नातू, अशोक भालेराव, सुरेश खैरे, सुदाम म्हसे, नरेंद्र गजभिये, सचिन सोनवणे, अविनाश पवार, हृदयनाथ गायकवाड, संजय पाटील, प्रभाकर कोचुरे, बापू बहिरम, मनिष गायकवाड, सुनिल लाड, लक्ष्मण माने, प्रदीप मोरे, बाळा निकाळजे, शेखर लोहकरे आदी कर्मचारी उपस्थित होते. कल्याणी लोखंडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली.

खोपोलीत जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

खोपोली : प्रतिनिधी

आद्य शिक्षिका, महिला शिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने खोपोलीत शुक्रवारी विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी नगरपालिका दालनात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष विनिता कांबळे यांच्यासह अन्य सभापती, नगरसेवक, नगरसेविका व अधिकार्‍यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महिला उद्योजक व महिलांसाठी कार्य करीत असलेल्या कांचन जाधव यांच्या पुढाकाराने व त्यांच्या स्वामिनी महिला फाउंडेशन आणि कानसा- वारणा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून खोपोली शहरातून आम्ही सावित्रीच्या लेकी अशी भव्य रॅली काढण्यात आली. खोपोलीतील सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष वनिता कांबळे -औटी, नगरसेविका केविना गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या समारंभात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावीत असलेल्या जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका तसेच केटीएसपी मंडळाच्या पदसिद्ध कार्यवाह रंजना रिठे यांना सावित्रीची लेक हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक कांचन जाधव यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पूजन

अलिबाग : जिमाका

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. 3) जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस  उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र मठपती यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व महिला कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply