Tuesday , February 7 2023

हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील यांना नेरळमध्ये अभिवादन

कर्जत : बातमीदार

हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने गुरूवारी (दि. 2) नेरळमध्ये सिद्धगड बलिदान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे देशासाठी हौतात्म्य प्राप्त झालेले हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली. हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी प्रास्ताविक केले तर, संतोष पवार यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वि. रा. देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन आणि गायक नंदेश उमप यांना हुतात्मा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी शेखर भडसावले आणि राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रवी काजले यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या वेळी हुतात्मा स्मारक समितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे, नेरळचे सरपंच रावजी शिंगवा, माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, जि.प. सदस्य अनसूया पादिर, रेखा दिसले, पं. स. सदस्य नरेश मसणे, जयवंती हिंदोळा, पोलीस अधिकारी अविनाश पाटील, सरपंच प्रवीण पाटील, माजी सरपंच भगवान चंचे, रोहिदास मोरे यांच्यासह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून रायगड प्रेस क्लबचे संघटक संजय मोहिते, स्मारक समितीचे दर्वेश पालकर, गणेश पवार, अभिषेक कांबळे, हृषीकेश कांबळे, संजय अभंगे, दीपक पाटील, कांता हाबळे, अजय गायकवाड, अजय कदम, दिनेश सुतार, दत्ता शिंदे, श्वेता शिंदे, सुमित क्षीरसागर, विजय शिर्के, ज्ञानेश्वर पेरणे, नितीन पारधी यांनी पुढाकार घेतला होता.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply