
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शनिवारी (दि. 4) आयोजित करण्यात आली होती. ही सभा स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात झाली. सभेत विविध विषयांवर चर्चा करुन त्यांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात 50 कंटेनर टॉयलेट खरेदी करून बसवणे कामे प्राप्त झाल्याने न्युनतम दराच्या इ निविदेस मान्यता मिळणे, आरोग्य विभागामार्फत महापालिका हद्दीत 5 ते 25 लक्ष्यापर्यंत करण्यात आलेल्या कामांचा अहवाल माहितीस्तव सादर करणे, महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालय व मुतार्यांचे चोकअप काढणे तसेच सेप्टिक टँक साफ करण्यासाठी सेवा पुरविणेकामी प्राप्त झालेल्या न्युनतम दराच्या इ निविदेस मान्यता मिळणे, लोक जैवविविधता नोंदवही तयार करणे प्राप्त झालेल्या मयुरेश्वर महिला व बालकल्याण संस्थेच्या प्रस्तावास मान्यता मिळणे आणि महापालिका क्षेत्रात स्ट्रक्चरल ऑडिट, इंटेरियर डिझाईन, लॅन्डस्केपिंग करीता सल्लागारांची 5 वर्षाकरीता निवडसुची करणे यांसारख्या विषयांवर चर्चा करुन त्यांना मंजुरी देण्यात आली. या सभेला नगरसेवक अजय बहिरा, मुकीद काझी, नगरसेविका सीता पाटील, अॅड. वृषाली वाघमारे, आरती नवघरे, प्रमिला पाटील, मोनिका महानवर, संतोषी तुपे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.