पनवेल : रामप्रहर वृत्त : रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे शाखेत मुख्याध्यापिका व्ही. एस. वेटम यांच्या अध्यक्षतेखाली ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. रिया पाटील, अंजली चव्हाण, कविता मुंडे या विद्यार्थिनींनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांनी आई माझी मायेचा सागर, अनमोल जन्म दिला ग आई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या गाण्यांचे सामूहिकरीत्या सादरीकरण करण्यात आले, उपशिक्षिका एच. आर. पाटील व सहकारी यांनी हुंडाबळीवर आधारित गीत सादर केले. या वेळी अनेक क्षेत्रात भारतीय महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला या स्त्रियांच्या वेशभूषेत साक्षी काकडे, केतकी भोईर, रिया ढवळे, रिद्धी, सिद्धी पवार, दिया तुडीलकर, नंदिनी खडतरे यांनी त्यांच्या कार्याची माहिती सांगितली. उपशिक्षिका एस. ए. भोसले म्हणाल्या 8 मार्च हा एकच दिवस महिलांचा आदर न होता तो वर्षभर होणे गरजेचे आहे. प्रसंगी कर्तृत्ववान महिलांची माहिती सांगितली. चूल आणि मूल या पारंपरिक कक्षेत अडकलेल्या अबला स्त्रीने काळाची पावले ओळखून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. आपल्या कर्तृत्वाचा कस लावत विविध क्षेत्रात यशोशिखर गाठले आहे. प्रसंगी महिला दिन उदयास कसा आला याची सविस्तर माहिती कार्यक्रमाच्या अध्यक्षा व्ही. एस. वेटम यांनी सांगीतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी यादव व आभार रोशनी पाटील हिने मानले. विशेष मार्गदर्शन उपशिक्षक पी. जी. पाटील, एच. एन. पाटील, उपशिक्षिका एस. आर. ठाकूर, पी. एन. म्हात्रे, टी. वाय. बनसोडे यांचे लाभले.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …