Breaking News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘व्हिजन रायगड’चे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्याचे सांस्कृतिक व व्यक्ती वैभव, पर्यटन आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्रांतिकारी ‘गो लोकल’ डिरेक्टरी अशा विविध विषयांचा संगम असलेल्या व्हिजन रायगड डॉट इन या वेबपोर्टलचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) मुंबईत झाले. या वेबपोर्टलची संकल्पना सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची आहे.                                          

सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या कार्यक्रमास रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, सचिन केळकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रायगडवर विशेष प्रेम आहे. त्यांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी योजना व भरघोस निधी उपलब्ध केलाच, शिवाय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मागोवादेखील घेतला. अशा व्यक्तींच्या मार्गदर्शनातून साकारलेले व्हिजन रायगड डॉट इन हे केवळ वेबपोर्टल नसून, सोशल इनोव्हेशनचा एक आगळा प्रयोग आहे. स्थानिक लोकांनी आपल्या परिसराबद्दलची संस्कृतीपासून ते व्यवसायाबाबतची विविध माहिती स्वतःच अपलोड करून रायगडच्या वैविध्याचे व बलस्थानांचे दर्शन संपूर्ण जगाला घडवावे असे याचे मुख्य सूत्र आहे. या उपक्रमात सामान्य नागरिकही सहभागी होऊ शकतात. त्यासाठी सभासद होऊन जिल्ह्यातील माहितीची देवाण-घेवाण करता येणार आहे.

असे आहे वेबपोर्टल

या वेबपोर्टलमध्ये रायगडची समग्र माहिती, परिचय, पर्यटन विविधा, संस्कृती वैभव, लक्षणीय, डिरेक्टरी, योजना, सभासद, घटनांचा लेखाजोखा अशी विविध माहितीयुक्त दालने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून याचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply