Breaking News

जेएनपीटीची प्रभावी कामगिरी

भारतात प्रथमच 5.10 दशलक्ष टीइयू हाताळण्याची कामगिरी

जेएनपीटी : वृत्तसेवा

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) या भारतातील प्रमुख कंटेनर पोर्टने त्यांची कार्गो हँडलिंगमधील प्रभावी कामगिरी कायम ठेवली आहे. पोर्टने सन 2019 या वर्षात 5.10 दशलक्ष वीस फूट इक्विवॅलंट युनिट म्हणजेच टीइयू यशस्वीपणे हाताळले आहेत. 2018मध्ये पोर्टने 5.5 दशलक्ष टीइयू हाताळले होते. अशाप्रकारे जेएनपीटी भारतातील सर्वाधिक व्यस्त पोर्ट बनले आहे. जेएनपीटीकडे 5 कंटेनर टर्मिनल असून त्यापैकी मुंबई येथील एपीएम टर्मिनलने (जीटीआय) वर्षभरात 2 दशलक्ष टीइयू हाताळले. त्यापाठोपाठ डीपी वर्ल्ड एनएसआयजीटीने 0.99 दशलक्ष टीइयू आणि पीएसए बीएमसीटीने 0.82 दशलक्ष टीइयू हाताळले. जेएनपीसीटीने 0.77 दशलक्ष आणि डीपी वर्ल्ड एनएसआयसीने वर्षभरात 0.52  टीइयू हाताळले. या उत्कृष्ट कार्यपद्धतीबरोबरच जेएनपीटीने सातत्याने व्यवसायामध्ये सुसूत्रता आणि सुलभता आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यासाठी जेएनपीटीने नवीन इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशन म्हणजेच आयटीआरएचओ कराराची सुरुवात केली आहे. हा करार जेएन पोर्टच्या सर्व टर्मिनल्सना लागू आहे. नवीन आयटीआरएचओ करार सर्व टर्मिनल्सनी स्वाक्षरीबद्ध आणि मान्य  केला आहे. यामध्ये जेएनपीसिटी, एनएसआयसीटी, एनएसआयजीटी, जीटीआय आणि बीएमसीटीपीएल यांचा समावेश आहे. दि. 29 जुलै 2019 रोजी अस्तित्वात आलेल्या या कराराची अंमलबजावणी दि.1 ऑगस्ट 2019पासून झाली. त्याच्यामुळे अधिकाधिक ट्रेन प्लेसमेंट, उत्पादकता मोजणे, कार्यक्षमता, बचत प्रभावी हाताळणी, आयसीडी बॉक्सेस इम्पोर्ट करण्यामधील वेळेमध्ये कपात, आयसीडी बॉक्सेस नियोजित वेळेत संबंधित टर्मिनलला एक्सपोर्ट करणे आणि जेएनपीटीमध्ये रेल भागीदारीही वाढवणे हे आहे. रेलकडून इम्पोर्ट कराव्या लागणार्‍या कंटेनरसाठी लागणारा ड्वेल टाईमही कमी करण्यात यश आले आहे. 2018मध्ये हा वेळ 116.09 तास होता, तो 66.16 तासांपर्यंत आणला आहे. (एप्रिल 18 ते मार्च 19) यासोबतच 2018 ते 2019 या वर्षात रेल्वेच्या भागीदारीत 14.66% वरून 16.22% इतकी वाढ झाली आहे. रस्त्याद्वारे कंटेनर इम्पोर्ट करण्यासाठी लागणारा ड्वेल टाईमही कमी करण्यात यश आले आहे. 2018मध्ये हा वेळ 41.32 तास इतका होता. तो एप्रिल ते डिसेंबर 19 या कालावधीत 28.65 तास इतका ठेवण्यात यश आले. ही सुधारणा तब्बल 30.66% इतकी आहे. यावर्षी जेएनपीटीने डीपी वर्ल्ड, एपीएम टर्मिनल्स आणि पीएसए टर्मिनल्स या खासगी टर्मिनलसोबत लुधियानामध्ये ट्रेड कालावधीत काँकरच्या समन्वयातून प्रत्येक आठवड्याला लुधियाना ते जेएन पोर्ट या मार्गावर खास ट्रेन सुरू केली होती. प्रत्येक शनिवारी चालणारी ही ट्रेन लुधियाना ट्रेडच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आली आहे.

जेएनपीटीविषयी

नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील सर्वांत मोठे कंटेनर हाताळणी करणारे बंदर असून भारतातील संपूर्ण बंदरांपैकी होणार्‍या एकूण कंटेनर्सच्या हाताळणीपैकी 52 टक्के कंटेनरची हाताळणी जेएनपीटीकडून केली जाते. 26 मे 1989मध्ये बांधणी झाल्यापासून केवळ तीन दशकांहून कमी वेळेत जेएनपीटी बल्क कार्गो टर्मिनलपासून ते देशातील आघाडीचे बंदर म्हणून नावलौकिक मिळवला आहे. जगभरातील पहिल्या 100 कंटेनर पोर्र्ट्समध्ये 28व्या क्रमांकावर असलेले जेएनपीटी बंदर हे जगभरातील 200हून अधिक बंदरांना जोडले आहे. सध्या जेएनपीटीकडे पाच टर्मिनल्सचे कार्य चालते. यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), दि न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), दि गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लिमिटेड (टीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नवीन बांधण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल) यांचा समावेश आहे. बंदरामध्ये साधारण कार्गोंसाठी शॅलो वॉटर बर्थ असून अन्य लिक्विड कार्गो टर्मिनल असून त्याचे व्यवस्थापन हे बीपीसीएल-आयओसीएल यांच्या संयुक्त भागीदारीतून करण्यात येत आहे.

आम्ही केलेले प्रयत्न आणि गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करत असल्यामुळेच आम्हाला यश मिळत आहे. आम्हाला विश्वास वाटतो की आगामी आर्थिक वर्षातही जेएनपीटीची प्रभावी कामगिरी कायम राहील. देशातील व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करीत आहोत. आम्ही विश्वास देऊ इच्छितो की जेएनपीटीचे संपूर्ण कुटुंब आमची कार्यक्षम कार्यपद्धती सातत्याने सुधारत राहील तसेच पोर्टची क्षमता जागतिक दर्जाला अनुकूल अशी राहील. जेएनपीटी भविष्यात नाविक क्षेत्रातील वाढती मागणी आणि जागतिक कल लक्षात घेऊन कार्यप्रदर्शन सुधारण्याचा प्रयत्न करीत राहील.

-संजय सेठी, चेअरमन, जेएनपीटी

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply