Monday , February 6 2023

जासई विद्यालयात विविध स्पर्धा

जासई : रामप्रहर वृत्त

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत शाळांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी (दि. 7) झाला. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुरेश पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, शिक्षक बंधू भगिनींना व उपस्थित सर्वांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून शुभेच्छा देण्यात आल्या.  या कार्यक्रमास विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन अरुण जगे, उरण पंचायत समिती सभापती नरेश घरत, स्थानिक सल्लागार समिती सदस्य अविनाश पाटील, अमृत पाटील, यशवंत घरत, नामदेव घरत, रामभाऊ मुंबईकर, यशवंत घरत, गणेश पाटील, नरेश घरत, गजानन पाटील तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply