Breaking News

तत्त्व आणि मूल्ये जपा; डॉ. रवींद्र शिसवे यांचे प्रतिपादन

अलिबाग : प्रतिनिधी

सामाजातील अपप्रवृत्तींना रोखायचे असेल तर प्रत्येकाने तत्त्व आणि मूल्ये जपली पाहिजेत. वेळ पडल्यास त्याविरोधात उभे ठाकण्याची हिंमत समाजातील घटकांनी दाखवली पाहिजे, असे मत पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केले.

अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशनचे अधिवेशन सोमवारी  (दि. 6) नागाव येथे झालेे. त्या वेळी डॉ. शिसवे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे होमिओपॅथी विभाग अधिष्ठाता डॉ. धनाजी बागल, असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अनघा भगत, डॉ. किर, डॉ. तुषार पाटील आणि डॉ. संदेश पाटील, डॉ. मयूर कल्याणी  यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैभव भगत यांनी, तर वार्षिक अहवालाचे वाचन डॉ. गणेश गवळी यांनी केले. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केल्याबद्दल डॉ. महेंद्र दोषी, डॉ. रवींद्र म्हात्रे, डॉ. मकरंद आठवले, डॉ. राज कल्याणी, डॉ. आशिष भगत आणि डॉ. सुनील बने यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. निशीगंध आठवले यांनी आभार मानले.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply