Breaking News

उरण तालुक्यातील काही गावांत पूरपरिस्थितीचा धोका

पालकमंत्र्यांनी पाहणी करण्याची मागणी

उरण : वार्ताहर

पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला आहे. तरीही काही ग्रामपंचायतींनी आपापल्या हद्दीतील गटारातील गाळ, नाल्यातील झाडे, झुडपे यांची साफसफाई केली नाही. सिडकोने सिडकोबाधित ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यांची साफसफाई केली नाही तसेच खाडी किनार्‍यावरील होर्डींग पाईपची साफसफाई केली नाही. त्यामुळे यावर्षी पावसाचे पाणी तालुक्यातील अनेक गावांत शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे, असा आरोप नागरिकांमधून होत आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी बैठकीच्या माध्यमातून या वर्षी उद्भवणार्‍या संभाव्य पूरपरिस्थितीवर उपाययोजना करण्याचा आढावा बैठकीच्या माध्यमातून घेतला आहे तसेच पावसाळ्यापूर्वी प्रत्येक प्रभागातील, गावातील कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकारीवर्गाला आदेश जारी केले आहेत, परंतु संबंधित शासकीय अधिकारीवर्गाने पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करता आपापल्या परिसरातील गटारातील गाळ, नाल्यातील झाडे, झुडपांची साफसफाई अद्याप केलेली नाही. सिडकोने सिडकोबाधित ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनार्‍यावरील होर्डिंग पाईपची साफसफाई केली नाही. त्यामुळे काही ग्रामपंचायत हद्दीतील गावांत पावसाचे पाणी शिरून पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कागदावर झालेल्या गटार, नालेसफाईवर विश्वास न ठेवता पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्यक्षात पाहणी करावी, अशी मागणी पूरग्रस्त नागरिक करीत आहेत.

Check Also

‘रयत‌’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या …

Leave a Reply