Breaking News

रायगडावर स्वच्छता मोहीम

भारतीय नौदल आणि महसूल विभागाचा उपक्रम

महाड : प्रतिनिधी

भारतीय नौदल आणि महाड महसूल विभाग यांच्या संयुक्त वतीने गुरुवारी (दि. 9) सकाळी किल्ले रायगडावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण असलेला रायगड किल्ला प्लास्टिकमुक्त करणे आणि या ठिकाणी स्वच्छता राखणे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याची भावना या वेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी व्यक्त केली. या अभियानात रायगडावरील राजसदर, नगारखाना परिसर, बाजारपेठ, जगदिश्वर मंदिर आदी ऐतिहासिक स्थळांजवळ स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करून गडावरून खाली आणला. या वेळी बोलताना उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी गडकिल्ल्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले, तर भारतीय नौदलाचे हिमांशू जोशी यांनीदेखील गडकिल्ल्यांचे महत्त्व स्पष्ट करून त्यांचे जतन करण्याचे आवाहन केले. या स्वच्छता अभियानात भारतीय नौदलाचे हिमांशू जोशी, कमांडर मनदीप कौर, लेफ्टनंट भूपेंद्र जोशी, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार, पोलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई, नायब तहसीलदार प्रदीप कुडळ, अरविंद घेमुड, समीर देसाई, मुख्याधिकारी जीवन पाटील आदी अधिकार्‍यांसह महाड महसूल विभागाचे कर्मचारी, भारतीय नौदलातील सैनिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply