Breaking News

राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची चमक

पाली ः प्रतिनिधी

स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 47वी राष्ट्रीय जलतरण, वॉटर पोलो, ड्रायव्हिंग स्पर्धा नुकतीच बंगळुरू येथे झाली. यातील ज्युनियर वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने रौप्य, तर मुलींच्या संघाने कांस्यपदक पटकावले. यामध्ये रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी बजावली. या स्पर्धेत सर्वेश माने, ओंकार माळी, भारत कुथे, सार्थक इंद्रे, साहिल कुथे, पार्थ चोप्रा, विराज मोरझारिया, प्रयाग जैस्वाल, अक्षय म्हात्रे, आदित्य थेरे, अमेय नगरकर, कुश प्रतानी, लव प्रतानी या जलतरणपटूंचा समावेश होता. स्पर्धेमध्ये मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या खेळाडूंत सिद्धी धनावडे, तन्वी मुळे, प्रेषिता तरे, प्राची साळुंखे, पल्लवी गुप्ता, याना अग्रवाल, नीम शुक्ला, मित्वी दत्ताजी, भक्ती मालमेघ, दिप्ती कल्पेश, स्वरा पाटील, शर्मिला पाटील, जस्मित कौर यांचा समावेश होता. या जलतरणपटूंना श्री. ठोसर यांनी मार्गदर्शन केले. यासाठी वॉटरपोलोचे प्रशिक्षक दत्ता तरे, शुभंकर ठोसर, तेजस पाठारे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी सर्व खेळाडूंचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, श्री. गोयल, चेतन वाळंज, उदय दिवेकर, श्री. अजिंक्य पाटील, रायगड जिल्हा स्विमिंग असोसिएशनचे सचिव राजू कोळी, शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.

Check Also

रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …

Leave a Reply