Monday , February 6 2023

आज नागोठण्यात अय्यप्पा महोत्सव

नागोठणे : प्रतिनिधी

येथील श्री अय्यपा सेवा मंडळाच्या वतीने 23 वा अय्यपा महोत्सव आज रविवारी (दि. 12) साजरा करण्यात येत आहे. नागोठणे प्रभुआळीतील कायस्थ प्रभू समाजाच्या रामेश्वर मंदिर परिसरात कुनत्तूमना शशिकुमार नंबुद्री यांच्या हस्ते हा पूजा महोत्सव संपन्न होणार आहे. पहाटे पाच वाजता महागणपती होमाने या धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ केला जाणार असून पहिल्या सत्रात अय्यपा स्वामी प्रतिष्ठापना, उषा पूजा, मध्यान्ह पूजा, तर दुसर्‍या सत्रात सायंकाळी निरमाला विळकू, महादीपाराधना आणि रात्री साडेनऊ वाजता हरिवरासनमने दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष के. वाय. सुधीर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी मंडळासह सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply