Breaking News

जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेटी लेबर कॉलनीत दोन गटांत हाणामारी

13 जणांवर गुन्हा दाखल

पेण ़: प्रतिनिधी

पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेटी लेबर कॉलनीत दोन गटात हाणामारी होऊन त्यामध्ये एका गटातील दोन व दुसर्‍या गटातील एक असे एकूण तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी एका गटातील पाच व दुसर्‍या गटातील आठ अशा एकूण 13 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारी (दि. 10) दुपारी 12.30 च्या सुमारास जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेटी लेबर कॉलनीत बोरीफाटा येथील एकास डोलवी येथील पाचजण मारहाण करीत होते. ती सोडविण्यासाठी  तिघेजण गेले असता आरोपींनी त्यांन शिवीगाळी करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच जातीवाचक बोलून आरोपींनी दुसर्‍या इसमास हेल्मेट व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव करीत आहे. या प्रकरणी दुसर्‍या गटानेदेखील फिर्याद दाखल केली आहे. जेएसडब्ल्यू कंपनीकडून जेटी लेबर कॉलनी येथील हाउसकिपींगचे काम मिळाले, या गोष्टीचा मनात राग धरून डोलवी येथील आठ आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ, लाकडी दांडक्याने व हाताबुक्याने मारहाण करून जखमी केले व साक्षीदाराच्या गळ्यातील चार तोळे व फिर्यादीच्या गळयातील अंदाजे पाच तोळे वजनाची सोन्याची चैन चोरून नेली. तसेच अरोपीने फिर्यादी व साक्षीदार यांना अ‍ॅट्रोसीटीच्या गुन्हयात अडकवितो अशी धमकी दिली, अशी फिर्याद दूसर्‍या गटाकडून दाखल करण्यात आली आहे. त्यावरून वडखळ पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निऱिक्षक शिंदे करीत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply