Breaking News

म्हसळ्यातील शिक्षकांनी घेतले केंद्र सरकारचे ‘निष्ठा‘चे धडे

म्हसळा : प्रतिनिधी

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा तालुक्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिकविणार्‍या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यात तीन सत्रांत तालुक्यात 253 जणाना प्रशिक्षण देण्यात आले. म्हसळ्यातील न्यू इंग्लीश स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या या निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रमात अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्ययन व मूल्यांकन, शाळा सुरक्षितता व सुरक्षा, वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये, आरोग्य व योगा, ग्रंथालय, युवा क्लब, शालेय नेतृत्त्व गुणवैशिष्ट्ये, किचन गार्डन आदी विषयांवर उत्तम प्रशिक्षण देण्यात आले. पनवेल येथील ज्येष्ठ अधिव्याखाता महाजनसर, रोहन पाटील, बशीर उलडे, विनोद मुसमुसे, महेश राव, अरविंद मोरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. केंद्र प्रमुख गजानन साळुंखे, म्हसळाचे दिपक पाटील, प्रकाश कोठावळे, बेडके, भोनकर सर आदिंनी या तालुका स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन व आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी पार पाडली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply