Sunday , February 5 2023
Breaking News

पेण शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला प्रारंभ

पेण : प्रतिनिधी

नगर परिषदेच्या विविध प्रभागात रस्त्यांच्या कामाला प्रारंभ झाला असून, शहरातील कुंभारआळी (प्रभाग क्रमांक 1) येथील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात झाली आहे. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिक का. रा. पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. भाजप कोकण विभाग कामगार संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, हितेश पाटील, गोवर्धन पाटील, रामभाऊ गोरीवले, गोपीचंद भोईर, संजय पाटील, दामोदर पाटील, प्रमोद गुरव, शशी भोईर, दामोदर घरत, दिलीप भगत, दिनेश भोईर, संदेश म्हात्रे, हेमंत गुरव, योगेश कदम, हर्षल जितेकर, गणेश गावंड, रोहन म्हात्रे आदींसह बचत गटाच्या महिला व नागरिक यावेळी उपस्थित होते. पेण नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त  चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अनेक विकासकामे मार्गी लागली असून, रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामालाही सुरूवात झाली आहे. विकासकामे करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही यावेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी दिली. कुंभारआळी भागातील नागरिकांनी या वेळी नगर परिषद  प्रशासन व नगराध्यक्षा प्रितम पाटील यांचे आभार मानले.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply