पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या वतीने करिअर कौन्सिलिंग उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. 20) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यात कोणकोणते कोर्स करावेत याबद्दल विशेष तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या अंतर्गत पहिल्या दिवशी नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. संस्थेच्या सर्व विद्यासंकुलांतील विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत करिअरविषयी अवगत करण्यात येणार आहे. या उपक्रमास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्यासह व्ही. लक्ष्मी रेखा, चसमिंदरकौर बक्शी उपस्थित होत्या.