Breaking News

खगोल अभ्यासक सोमणांनी घडवली खोपोलीकरांना चंद्राची सफर

खोपोली : प्रतिनिधी

आजपर्यंत चंद्र आपण कथा, कविता, कादंबर्‍या या सगळ्यांमध्ये वाचला, संगीतामधून ऐकला, परंतु  कल्पनेतून चंद्रावर जाण्याचा अनुभव खोपोली करांना काल आला. तो योग ज्येष्ठ खगोल अभ्यासक व पंचांग कर्ते दा. कृ. सोमण यांनी खोपोली करांना आणून दिला. खोपोली करांना दीड तासात मनाच्या भरारीने ते चंद्रावर घेऊन गेले आणि खोपोली करांचे सॉफ्ट लँडिंग हे चंद्रावर झाले. त्याचा सुखद अनुभव शेकडो खोपोली करांनी काल घेतला.

खोपोली ब्राह्मण सभेच्या वतीने अभिनव व्याख्यानमाले अंतर्गत ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांचे चला चंद्रावर जाऊ या हे व्याख्यान शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र हर्डीकर उपाध्यक्षा सुनिता पाटणकर, कार्यवाह अनिल रानडे, खजिनदार सुधाकर भट उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. माधव

जोशी होते. चला चंद्रावर जाऊ या या व्याख्यानाच्या दिवशीच छायाकल्प चंद्रग्रहण असल्यामुळे श्रोत्यांमध्ये चांगलाच उत्साह होता. सोमण यांनी व्याख्यानाच्या सुरुवातीला ग्रहणात धार्मिक विधी पार पाडायचे असतात, गरोदर स्त्रियांना ग्रहण हानिकारक असतं, अशा अनेक गैरसमजुती असल्याचे सांगितले. इस्त्रो ही संस्था स्थापन झाल्यानंतर भारताच्या अंतराळातील कामगिरीला लक्षणीय भरारी घेता आली आहे असे त्यांनी अनेक उदाहरणातून सांगितले. 2008 साली चांद्रयान-1 मधून आपण जगाला चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे दिले. चांद्रयान 2 मोहीम ही फसली असली असे अनेक जण म्हणत असले तरी ऑर्बिटर हे पुढील सात वर्षे कार्यरत राहणार असून त्याचा फायदा भारताला तसेच जगाला होणार आहे. आणि भविष्यातील चांद्रयान 3  मोहीम ही नक्की यशस्वी होईल असा

विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास पाठक यांनी केले शेवटी सुधाकर भट यांनी आभार मानले. पार्ले कंपनीचे किशोर शेळके, संस्थेच्या सहकार्यवाह वृषाली बेलसरे, दिपक बाम, राजेंद्र पेठे यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) …

Leave a Reply