कडाव : प्रतिनिधी
कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरून गेल्या आठ दिवसांपासून मोठमोठ्या अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून, त्यासाठी रात्री सात-आठ तास वीजपुरवठा बंद केला जात असल्याने जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरून नाशिक, शहापूर, मुरबाड येथून येणार्या अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. सध्या कंपन्यांसाठी लागणार्या बॉयलर्सचे मोठमोठे पार्ट याच मार्गावरून नेले जात आहेत. रात्रीच्या वेळी सात-आठ तासांसाठी वीजपुरवठा बंद करून ही अवजड वाहने हालवली जात आहेत. त्याचा त्रास परिसरातील जनतेला होत आहे.
कर्जत-मुरबाड राज्यमार्गाने अवजड वाहनांची वाहतूक करताना वीजपुरवठा बंद केला जातो, या संदर्भात आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नाही किंवा त्याच्या परवानगीसाठी आमच्यापर्यंत कोणी आलेले नाही. याप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल.
-श्री. घुले, उपविभागीय अभियंता, महावितरण, कर्जत